गुंजाळवाडीचे माजी उपसरपंच रोहिदास गुंजाळ भाजप मित्र पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार !
संगमनेर / लोकवेध live न्यूज
गुंजाळवाडी येथील काँगेसपक्षा बरोबर एकनिष्ठ असलेले, संयमी, मितभाषी, दांडगा जनसंपर्क, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे माजी उपसरपंच, मा. तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास गुंजाळ यांनी ग्रामपंचायत निवडणूकमध्ये सरपंच पदासाठी अर्ज भरला होता.
त्यांनी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कामांच्या बळावर आमदार थोरात यांच्याकडे अधिकृत उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. त्याप्रसंगी त्यांनी योग्य निर्णय घेऊ असे सांगितले परंतु इंद्रजित थोरात यांनी ऐनवेळेस उमेदवारी नाकारली तसेच निवडणूक लढणार असेल तर आमदार थोरात यांचे फोटो वापरायचे नाही असा सज्जड दम रोहिदास गुंजाळ व त्यांच्या शिष्टमंडळाला दिला. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी गावातील जेष्ठ नेते यांच्या बरोबर चर्चा करून नामदार विखे पाटील यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
रोहिदास गुंजाळ यांनी भाजपचे सतीश कानवडे, रवींद्र थोरात,अमोल खताळ, सुयोग गुंजाळ स्थानिक पदाधिकारी, पंढरीनाथ गुंजाळ,संभाजी गुंजाळ, ऋषी गुंजाळ तसेच भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार नामदेव गुंजाळ, महेश जगताप, सुखदेव गुंजाळ यांच्याबरोबर चर्चा करून भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतले लवकरच नामदार विखे साहेब यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेणार आहे असे सांगितले रवींद्र थोरात यांनी त्यांचे भाजप मध्ये स्वागत केले. रोहिदास गुंजाळ यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन झाले. ग्रामस्थांनी तर अतिशय योग्य निर्णय घेतला असे सांगितले.
रोहिदास गुंजाळ यांनी यापुढे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे काम एकनिष्ठ पने करणार असल्याचा व ग्रामपंचायत निवडणूक मध्ये आपले सर्व उमेदवार निवडणून आणू असा निर्धार व्यक्त करून भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन वाटचाल करू असा शब्द दिला. सरपंच झाल्यानंतर गुंजाळवाडी गावामध्ये विखे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून गावचा कायापालट करणार असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले.

