भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या पायाभरणीत अब्दुल कलाम आाझाद यांचे मोलाचे योगदान – आ. थोरात
संगमनेर / लोकवेध live न्यूज
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू याच्या मंत्रीमंडळात मौलाना अब्दुल कलाम आझाद हे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यानी त्या वेळी भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या पायाभरणी साठी अत्यंत मोलाचे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे
यशोधन कार्यालय येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त व पंडितराव तात्या थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होत. यावेळी नवनाथ आरगडे,जावेद शेख, नजीर सय्यद प्रा. बाबा खरात, सुरेश झावरे, श्रीराम कुऱ्हे ,अनिल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. थोरात म्हणाले की, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे महात्मा गांधी याच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले महत्वाचे नेते होते. ते काही काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षाही होते. त्यांचा इस्लाम धर्माचा खुप अभ्यास होता. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी नेहमी धर्मनिरपेक्षता व राष्ट्रीय एकात्मतेला महत्व दिले. आजच्या युगात आपल्या समोर राष्ट्रीय एकसंघता व राष्ट्रीय एकात्मता ही अधिक मजबुत करण्याची गरज आहे. आज धर्माच्या, जातीच्या नावावर लोकामध्ये फुट पाडली जात आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील या थोर महान नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच स्वप्न पाहिले. त्याला धक्का बसतोय की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे. या विघातक शक्ती या समाजात तेढ निर्माण करु पाहत आहे. अशा शक्तींना रोखण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहनही त्यांनी .
प्रा. बाबा खरात म्हणाले की, पंडितराव थोरात हे अत्यंत आदर्श व जीवन जगले. समाजासाठी केलेल्या कामामुळे ते कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहणार असल्याचे ते म्हणाले . यावेळी अनेक नागरीक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.