भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय कनोली येथे विद्यार्थ्यांची 22 वर्षानंतर स्नेह भेट 

पिंपरणे / लोकवेध live न्युज 

दीपावली सणाचे औचित्य साधून तब्बल २२ वर्षानंतर १०वी ची २००१ ची बॅच पुन्हा भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय कनोली येथे एकत्र आली. यावेळी २००१ च्या बॅचला शिकवणारे शिक्षकही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील शिक्षकांच्या शिक्षेमुळे व कडक शिस्तीमुळे आज आपण घडलो आहोत असे मत सर्वांनी व्यक्त केले. यावेळी या बॅचमधील अनेक विद्यार्थी हे चांगले उद्योजक, चांगले शेतकरी,पोलिस , प्राध्यापक, विविध कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. शाळेसाठी सुसज्ज ग्रंथालय व पुस्तके यासाठी मदत करण्याचे आश्वासन या सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिले.

यावेळी पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेविषयीच्या व कनोली गावाविषयीच्या आठवणी सांगितल्या. डोंगरे मॅडम आपले मनोगत व्यक्त करताना भाऊक झाल्या .गावाने व शाळेने खूप काही मिळवून दिलं , सर्व विद्यार्थी एकत्र आल्यामुळे आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. रिटायर झाल्यानंतर आम्ही एका कोपऱ्यात होतो परंतु गेट टूगेदरच्या निमित्ताने आम्हाला कोप-यातून बाहेर काढून पुन्हा शाळेत आणलं त्यामुळे सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले.

शाळेचे प्राचार्य के.एम.वर्पे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजची पालकांची भूमिका खूप बदलली आहे त्यामुळे विद्यार्थी घडवत असताना अनेक अडचणी येतात परंतु पुढील काळात वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेचा दर्जा अधिक वाढवण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम वर्पे य़ांनी अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांच्या काळातील शाळेच्या आठवणी सांगितल्या,आपल्या गावातील विद्यार्थी चांगले काम करत आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

यावेळी दिवंगत शिक्षक म्हस्के सर ,गुंजाळ सर , सराफ मॅडम ,राहूल वर्पे ,बाळासाहेब बलसाने ,कल्पना वर्पे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी के.एम.वर्पे सर,पाटील सर , डोंगरे मॅडम ,थोरात सर , फापाळे सर, खरात सर, डोके सर ,संजय वाबळे सर,भोसले सर ,सिताराम वर्पे,शिवाजी वर्पे,बाबासाहेब वर्पे,नामदेव वर्पे,थाॅमस जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन आबासाहेब वर्पे ,संदीप पारखे, शांताराम हारदे, पौर्णिमा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!