मुलांच्या शाळा सुसज्ज व अद्ययावत व्हाव्यात
यातूनच विविध क्षेत्रात समाजाला अपेक्षित असणारे नेतृत्व घडेल.- आ. सत्यजित तांबे
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
बहुजन समाजाच्या मुलांच्या शाळा सुसज्ज व अद्ययावत व्हाव्यात. यातूनच विविध क्षेत्रात समाजाला अपेक्षित असणारे नेतृत्व घडेल. यासाठी सर्वांनी शाळा समोरच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी पिंपरणे येथील सत्कार समारंभात व्यक्त केले.
पिंपरणे ग्रामस्थांच्या वतीने आणि परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार समारंभ तसेच त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नारायण मरभळ होते.यावेळी अध्यक्ष बापूसाहेब देशमुख उपाध्यक्ष डी.एम देशमुख ,सचिव कैलासशेठ काळे, स्कूल कमिटी सदस्य सुभाष पवार मुकुंद डांगे,मुख्याध्यापक दशरथ वर्पे राजेंद्र देशमुख, ज्ञानदेव राहींज प्राचार्य डी आर सोनवणे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत बागुल अर्चना रोहम, विद्या काळे,संजय बागुल, गंगाराम वाकचौरे उमाजी जोर्वेकर प्रभाकर ठोंबरे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते
ग्रामस्थांच्या वतीने आमदार तांबे यांचा सत्कार करण्यात आला
तांबे पुढे म्हणाले की बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे संस्था कार्य करीत आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था चालवणे अवघड काम आहे. पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज शैक्षणिक संकुल उत्तमरित्या बापूसाहेब देशमुख चालवीत आहेत. त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. मीही याच गावचा आहे. शक्य होईल ती मदत मी या शैक्षणिक संकुलासाठी करीन. आमदार निधीच्या मर्यादा लक्षात घेऊन खासदार लोखंडे यांच्या निधीतून सध्या मी विद्यालयास मदत करीत आहे. भविष्यात मोठा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी आपण येथे उभा करू. विशेषता या विद्यालयामुळे मुलींच्या शिक्षणाची चांगली सुविधा निर्माण झालेली आहे. अनेक विद्यार्थिनी उच्चशिक्षित होऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत .मुली सध्या पुढे जात आहेत .मुलांनीही अभ्यास व व्यक्तिमत्व विकासाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सुयश मिळवावे असे विचार आमदार तांबे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार तांबे यांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम क्रमांकचे व विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी यांना स्मृतीचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जयहिंद आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री दशरथ वर्पे सर यांनी आपल्या मनोगतात गावोगावी असणाऱ्या शाळा म्हणजे शैक्षणिक ज्ञान मंदिर आहेत .त्यासाठी गावातील सर्वांनी आपले योगदान द्यावे. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीमध्ये मालपाणी विद्यालयात केलेले कार्य व पिंपरणे येथे बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले कार्य यातून आपण शिकत गेलो, घडत गेलो.असे प्रतिपादन त्यांनी केले. याविषयी विशेष आभार मानले.
ग्रामस्थांच्या वतीने श्री गंगाराम वाकचौर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी आमदार सत्यजित तांबे यांना लाभलेला वारसा असला तरी तो आमदार सत्यजित तांबे यांनी स्वकर्तृत्वाने व प्रयत्नाने सिद्ध करून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांना खूप उज्वल भवितव्य आहे. असे प्रतिपादन केले तसेच आमदार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व भविष्यातील प्रगतीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
परिचय व प्रास्ताविक माजी प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले. आभार श्री ललित शेळके यांनी मांनले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बांगर यांनी केले. या कार्यक्रमासाठी आदी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
