अध्यात्मिक मार्ग दाखविणारे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराजांचे कार्य अलौकिक – महंत दत्तगिरी महाराज  
वरवंडीच्या फिरत्या नारळी सप्ताहाची दत्तगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता
 आमदार बाळासाहेब थोरात व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांची उपस्थिती
 आश्वी  / लोकवेध live न्यूज 
अध्यात्मिक मार्ग दाखविणारे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज यांचे कार्य अलौकिक असुन हा अखंड हरिनाम सप्ताह वारकऱ्यांचा महाउत्सव व संत विचारांची प्रेरणा देण्यासाठी हरीनाम सप्ताह गरजेचा आहे  मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे,मनोवृत्तीत बदल झाला तरच खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व  हरिनामात आसल्याचे प्रतिपादन महंत दत्तगिरी महाराज यांनी केले 
संगमनेर तालुक्याच्या वरवंडीतील ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज बिरोबा महाराज या फिरत्या पंधराव्या नारळी सप्ताहाची दत्तगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता  झाली यावेळी ते बोलत होते
    यावेळी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौं. शालिनीताई विखे पाटील, बाजार समिती सभापती  मा.शंकर पाटील खेमनर, संगमनेर कारखाना संचालक  इंद्रजित खेमनर, सभापती सुनंदाताई जोर्वेकर,  सौ रोहिणीताई निघते  निघूने मॅडम, सौ. मिराताई शेटे अँड पोपटराव वाणी, शरदनाना थोरात,डॉ कहार, राजहंस दूध संघाचे व्हा चेअरमन राजेंद्र चकोर,ग्राम विस्तार अधिकारी आनंद कांडेकर आदि उपस्थित होते.
 माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या 
 संतांच्या विचारानेच आताची पिढी घडतेय महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीत अनेक मोठे मोठे संत होऊन गेले त्यात ब्रह्मलीन माणिक गिरी महाराज हे एक महान संत होऊन गेले त्यांच्या नावाने सुरू झालेला हा सप्ताह मोठा मोठा होत राहो  असे सौ.शालिनी विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाल्या
 आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले 
 वारकरी संप्रदाय हा आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान आहे सप्ताहामध्ये लोक सर्व दुःख कष्ट विसरून सहभागी होतात 
 आज पांडुरंग कुठे आहे असे विचारलं तर नक्कीच या ठिकाणी आहे असंच म्हणावं लागेल ब्रह्मलीन माणिगिरी महाराजांसारखे महंत होणे नाही संतांच्या विचाराची गरज आज जगाला आहे संत विचारात कुठल्याही जाती धर्माचे बंधन नाही तर संतांचे विचार सर्व मानव जातीच्या हितासाठी  होते असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
तसेच गावातील ज्या महिला बचत गटांनी सात दिवस परिश्रम घेतले त्यांचा सौ.शालिनी विखे ‌पाटिल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सप्ताहाची सुरुवात १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर महंत माणिकगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले  त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली.यावेळी वरवंडी चाळीसक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी झाली होती प्रसंगी भाविकांनी मोठ्या चैतन्यात फुगडीचा आनंद घेतला प्रसंगी महंत दत्तगिरी महाराजांनी वरवंडी गावकऱ्यांचे आभार मानले सप्ताहासाठी लाभलेली जागा भोसले परिवाराने दिली तसेच सप्ताह कमिटी महिला  बचत गट, विविध हायस्कूल ज्या ज्या भाविकांनी सप्ताह काळात सेवा केली  या सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली.
सप्ताह कमिटीचे अध्यक्ष अशोक गागरे व अर्जुन वर्पे यांचा यावेळी यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!