श्रीक्षेत्र वरवंडीत ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक उत्साहात
आश्वी / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र वरवंडी येथे सुरू असलेल्या ब्रह्मलीन महंत मानिगिरीजी महाराज बिरोबा महाराज फिरता नारळी पंधरावा सप्ताहाच्या सातव्या दिवशी ज्ञानेश्वरी पारायण समाप्तीनंतर भव्य दिव्य ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक व महंत दत्तगिरी महाराज यांची रथामधून पुष्प टाकून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
वरवंडी गाव ते ब्रह्मलीन महंत माणिगिरी महाराज समाधी दर्शन घेऊन पुन्हा मिरवणूकीची साप्ताह ठिकाणी येऊन समाप्ती करण्यात आली.यावेळी अनेक महिला आणि पुरुष भाविक हजारोंच्या संख्येने लोकांनी सहभागी होत टाळ मृदंगाचा गजर करत निरूपण मिरवणुकीमध्ये सहभागी होत मिरवणुकीची शोभा वाढवली.मृदुंगाच्या व टाळांच्या गजरावर ठेका धरत भाविकांनी फुगडी खेळून मिरवणुकीमध्ये रंगत आणली
साप्ताहच्या शेवटच्या दिवशी रविवार दि २४ रोजी सकाळी १० वाजता महंत दत्तगिरी महाराज यांचे जाहिर हरीकीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद घेऊन सप्ताहाची सांगता होईल या महाप्रसादासाठी हजारो भाविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या महप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी दत्तगिरी महाराज यांनी केले.
या सप्ताहसाठी आलेल्या सर्व भाविकांचे वरवंडी ग्रामस्थांकडून आभार मानत सप्ताह समाप्त केला जाईल असे यावेळी संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
