शिर्डी हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून चुकीचे आहे – आत्माराम देशमुख
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
शिर्डी हे इतर तालुक्यासाठी असलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे 100 टक्के चुकीचे असून शासनाने ते कार्यालय स्थगित करुन संगमनेर येथे जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करणेत यावे.कारण  शिर्डी हे जागतिक किर्तीचे तिर्थक्षेत्र असून तेथे दररोज  देश, विदेश, भारताच्या कानाकोप-यातून प्रचंड अफाट प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे जनता व प्रशासन यांची ससेहोलपट करु नये.
तरी जनता व प्रशासन यांना  न्याय देण्यात यावा. ही नम्र विनंती.
घारगाव तालुका राजुर तालुका अकोले तालुका संगमनेर ग्रामीण तालुका राहता तालुका कोपरगाव तालुका श्रीरामपूर तालुका , या सर्व तालुक्यांना संगमनेर हे मध्यवर्ती ठिकाण असून प्रत्येक तालुक्यांचे अंतर फक्त 50 किमी अंतरावर आहेत त्यामुळे या सर्व तालुक्यांना सामान्य देता येईल म्हणून संगमनेर हे मध्यवर्ती ठिकाण आहे संगमनेर जिल्हा करावा ही आमची विनंती आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!