आशा सेविकांचा  प्रांत कार्यालयावर घंटानाद आंदोलन 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी संगमनेर तालुक्यातील आशा सेविका गटप्रवर्तक महिला यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणापर्यंत घंटानाद आंदोलन करण्यात आले विविध मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात आले अशा सेविका यांना सात हजार रुपये मानधन तर गटप्रवर्तक महिला यांना दहा हजार रुपये मानधन मिळावे ही मागणी आरोग्य मंत्री यांनी तोंडी स्वरूपात मान्य करून अशा सेविकांचं आंदोलन दरम्यान दिलेला शब्द न पाळल्यामुळ आझाद मैदान मुंबई येथे गेली पंधरा दिवसापासून महिला उपोषणास बसलेल्या आहेत तसेच गेली पाच दिवस पासून संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आशा सेविका गटप्रवर्तक महिलांच्या वतीने चूलबंद आंदोलन सुरू आहे त्याच प्रकारे आज घंटानात आंदोलन देखील सुरू केलेले आहे सदर आंदोलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना मा शहर प्रमुख अमरकतारी मा तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे तालुकाप्रमुख संजय फड अमित चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे मोकळ ,ओहरा दीपक जी साळुंखे समाजसेवक सचिन भाऊ साळुंखे यांनी देखील सहभाग नोंदवला व आशा सेविका गटप्रवर्तक महिला यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी आंदोलन दरम्यान अशा सेविका गटप्रतक महिलांनी घंटानाद आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधले यादरम्यान प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी सदर निवेदन स्वीकारले व लेखी स्वरूपात आपली मागणी जिल्हाधिकारी कार्यालयास कळवली त्याबाबतचे पत्र देखील अशा सेविकांना दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!