तेव्हा कुठे गेला होता राजासुता तुझा धर्म ?- हिंदुत्ववादी संघटनाचा सवाल

मागण्यावर आम्ही ठाम,मोर्चा फक्त स्थगित,  रद्द नसल्याचा खुलासा!

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर शहर आणि तालुक्यात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थींनीच्या अत्याचाराच्या घटना घडत असतानाही त्यांचे गांभीर्य न दाखवता संगमनेर अशांत होत असल्याची काळजी करणाऱ्यांची संवेदनशीलता तेव्हा कुठे गेली होती असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात बजरंग दलाने म्हणले आहे की, तालुक्यात व शहरात घडलेल्या काही घटनांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाच्या माध्यमातून शहरात किंवा तालुक्यात कुठेही अशांतता निर्माण होईल असा प्रयत्न आमचा नव्हता.यापुर्वी सुध्दा झालेला मोर्चा हिंदू समाजाच्या एकजुटीने यशस्वी झाला होता.परंतू हिंदू समाजाची होत असेलेली एकजूट अनेकांना देखवत नसल्या मुळेच या संघटनांना जाणीवपुर्वक बदनाम करण्याचे काम धर्म विरोधी प्रवृतीकडून सुरू असल्याचा आरोप बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला. त्यातून प्रशासनाला हाताशी धरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र कसे केले हे लपून राहीलेले नाही.त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात येणार्या मोर्चाचा धसका कोणी घेतला हेच आता उघड झाले असून पहील्या मोर्चालाही पत्रक काढून विरोध करणाऱ्या प्रवृत्ती कोण होत्या हे संगमनेरच्या नागरीकांनी पाहीले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

काल प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्यांनी कुठेही मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनाबाबत उल्लेख केला नाही.या घटनांची चौकशी करा आशी मागणीही केली नाही.मग सकल हिंदू समाजासाठी एकत्रित आलेल्या संघटनांना केवळ बदनाम करण्यासाठी एकत्रित आलेल्यांची संवेदनशीलता मुलींवर अन्याय अत्याचार होत असताना कुठे गेली होती असा प्रश्न उपस्थित करून शहर आणि तालुक्यात घडणार्या घटनांबाबत आपण किती गंभीर होता हे वेळोवेळी
पाहायला मिळाले असल्याचा टोला बजरंग दलाने लागावला आहे.

सकल हिंदू समाजाच्या मागण्याबाबत प्रशासनाने दाखवलेले गांभीर्य लक्षात घेवून मोर्चा स्थगित केला आहे. मात्र तो रद्द झालेला नाही असे स्पष्ट करून भविष्यात मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास मोर्चा काढण्याबाबतचा आमचा निर्धार कायम असल्याचे कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे, प्रशांत बेल्हेकर, गोपाळ राठी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!