मिशन आरंभ शिष्यवृत्ती व नवभारत साक्षरता परीक्षेत टाकळी शाळेचे सुयश
अकोले / लोकवेध live न्यूज
जिल्हा परिषद अहमदनगर प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षेत टाकळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत सुयश मिळविलेले विद्यार्थी कु. रूतुजा महेश तिकांडे, अस्मिता भाऊसाहेब साळवे व आर्या भानुदास दातखिळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच उल्लास नव भारत साक्षरता पायाभूत परीक्षेत देखील टाकळी शाळेने नोंदविलेल्या पाच असाक्षर परीक्षार्थींनी उत्तम यश संपादन केले आहे. त्यामध्ये सत्यभामा हरिभाऊ मोरे, मिराबाई हरिभाऊ नाईकवाडी, बकुबाई रामचंद्र भरीतकर, लक्ष्मीबाई कारभारी फोडसे व मंदाबाई उत्तम मोरे या नवसाक्षरांचा समावेश आहे. टाकळी शाळेच्या या दुहेरी यशाबद्दल ग्रामपंचायत टाकळीचे सरपंच दत्तु भाऊ गरुड व कार्यकारिणी सदस्य, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष डॉ. जनार्दन मोरे, उपाध्यक्ष बाळासाहेब फोडसे, रामहरी तिकांडे, संतोष तिकांडे, भानुदास तिकांडे, पोपटराव शेवाळे, दत्ताराम दातखिळे, सागर तिकांडे व भाऊराव नाईकवाडी यांनी देखील शाळेचे अभिनंदन केले आहे. शैक्षणिक वर्षभरात मिशन आरंभ शिष्यवृत्ती अभियान व नवभारत साक्षरता कार्यक्रम टाकळी शाळेत उत्कृष्टरित्या राबविल्याबदल अभयकुमार वाव्हळ गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोले, अरविंद कुमावत पोषण आहार अधिक्षक अकोले, अनिल गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी बीट देवठाण, केंद्र प्रमुख रोहिणी खतोडे यांनी टाकळी शाळेतील मिशन आरंभ यशस्वी विद्यार्थी व नवसाक्षर तसेच शिक्षक वृंद श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, संजय शिंदे व स्वयंसेविका नीता लेंभे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
