शिर्डी लोकसभेत महिला राज येणार ; जनता हीचं माझी शक्ती ही शक्तीचं मला साथ देणार ! उत्कर्षा रुपवते

हितचिंतकांनी “ना माजी ना आजी , आता बाजी मारणार उत्कर्षाताई ” अशी टॅग लाईन तयार केली

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत मिळणाऱ्या चिन्हा बद्दल आजिबात चिंता नसून एक सक्षम पर्याय म्हणुन लोक माझ्या मागे निश्चितचं उभे राहतील. तर माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नसून जनता हीचं माझी मोठी शक्ती सोबत आहे. त्याच्याचं पाठबळावर मला लढायचे असून जनता नक्कीच मला साथ देणार असा आत्मविश्वास शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या तरुण तडफदार महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला .

संगमनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून त्या बोलत होत्या . यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते बिनशर्त पाठिंबा देताना दिसले .

उत्कर्षा रुपवते पुढे म्हणाल्या की , तीन पिढ्यापासून आम्ही काँग्रेससोबत होतो. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते परंतु या मतदार संघात माझ्यासाठी शेवटची संधी होती. त्यामुळे हे पाऊल उचलवावे लागले. आमदार बाळासाहेब थोरात हे जेष्ठ नेते आहेत माझ्या साठी ते आजही आदरणीय आहेत. काहीही झाले तरी मी जिल्ह्याची मुलगी आहे. मी सगळ्या नेत्यांना भेटून माझी भूमिका मांडणार आहे. त्यांनी मला मदत करणे शक्य आहे त्यामुळे मी माझी भूमिका मांडणार आहे.

दोन्ही आजी माजी खासदारांनी काय काम केले आहे हे जनतेसमोर आहे. एक नवीन उमदा महिला चेहरा नक्कीच लोक पसंतीस उतरणार आहे असा विश्वास मला आहे. काँग्रेस मध्ये आमच्या तीन पिढ्या गेल्यात. महाविकास आघाडीत वाटाघाटीत नक्कीच काही चुका झाल्यात. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसने आपल्या वाट्याला घ्यायला पाहिजे होती. पण रेटा कमी पडला असे मला वाटते. शिर्डी मधून ही माझ्यासाठी शेवटची संधी होती म्हणून मी मोठे पाऊल उचलले.

महिलाच्या सबलीकरणासाठी त्यांच्या उद्योजकतेला वाव देण्यासाठी काम करणार असून युवक, शेतकरी मतदार संघातील प्रश्नांसाठी पुढील काळात काम करणार आहे. दोन्ही आजी माजी खासदारांनी काय काम केले हे जनतेने पाहिले आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी माझ्यावर टीका करताना विचार करावा स्वतः 10 वर्षे किती पक्ष फिरून आलेत हे बघावे. वंचित भाजपची बी टीम आहे हे आरोप धांदल खोटे आहेत. ते कोणत्या टीम चे आहेत नक्की हे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. असा सल्ला भाऊसाहेब वाकचौरेंना देताना जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहील. ही लढाई धन शक्ती विरून जनशक्ती ची आहे. असे त्या म्हणाल्या.

जेव्हा दोन्ही पर्याय चांगले नाहीत असे जनता म्हणतेय त्यामुळेच मी हे जनरेट्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षे जिथे मी काम केले त्यांनी मला संधी द्यायला पाहिजे होती ही खंत कायम राहील.

ज्यांनी संविधान लिहिले अश्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेलो आपण कार्यकर्ते आहोत. त्याच डॉ. आंबेडकर यांच्या नातूं सोबत मला काम करायला संधी मिळतेय ही मोठी भाग्यची गोष्ट आहे.

ना माजी ना आजी , आता बाजी मारणार उत्कर्षाताई …
आजी – माजी खासदारांचा इतिहास बघता माझ्या हितचिंतकांनी “ना माजी ना आजी , आता बाजी मारणार उत्कर्षाताई ” अशी टॅग लाईन तयार केली असून ही लोकांच्या पसंतीला उतरली असून अनेक संघटनेच्या लोकांचे फोन येत असून ते बिनशर्त पाठिंबा देत आहे .तर नवीन पक्षात प्रवेश केल्यानंतर चे लोकांचे प्रेम बघता जनता जनार्दन नक्कीच मला साथ देतील असा विश्वास व्यक्त करत बुधवार दि .२४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः दोन – तीन सभा घेणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!