अंभोरेत  येडुमाता पायी दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत!…

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

सालाबाद प्रमाणे प्रति पंढरपूर समजले जाणा-या अकोले तालुक्यातील चास पिंपळ्दरी येथिल आदिवासी भिल्ल समाजाचे श्रध्दास्थान ‘येडुमाता ‘देवीचे दर्शन सोहळा आणि भव्य यात्रात्सोव निमित्ताने नेवासा येथिल आदिवासी सेवा प्रबोधन संघ यांचे वतीने आयोजित करण्यात येते.या पायी दिंडी सोहळ्याचे अंभोरे गावात आगमन होताच गावातील आदिवासी भिल्ल समाजाचे महिला,पुरुष,युवक तसेच अंभोरे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात डी.जे.वर येडुमातेचे पारंपारिक गिते वाजवून अगदी बेधुंद होवुन नाचून ,फटाक्याचे अतिशबाजीत येडुमाता पालखीचे गावातून प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढून स्वागत केले.मिरवणूक मल्हारराव होळकर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात आणण्यात आली.तिथे राजमाता अहिल्यदेवी होळकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,एकलव्य या महापुरुषांचे गावातील प्रमुख मान्यंवराचे शुभ हस्ते पूजन, पुष्प हार अर्पण करुन संपन्न झाले.महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त ह.भ.प.भगवान दास शास्री महाराज यांचे समाज प्रबोधन प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला.व्यासपिठावर ह.भ.प.भगवान दास शास्री घुगे महाराज,दिंडी चालक ,परसराम माळी,एकलव्य आदिवासी संघटना प्रदेशाध्यक्ष श्री.शिवाजी गागुंर्डे,ज्ञानेश्वर भणगडे,सोमनाथ माळी,गणेश पाचपांडव,सचिन मोरे,सुभाष बर्डे,रणजित माळी,दीपक पवार, व त्यांचे सहकारी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.दिंडी सोहळ्यात पाचशेच्या वर महिला,पुरुष,युवक,मुले,मुलिंचा सहभाग होता.उपस्थित भाविकांना श्री.सुभाषराव हळ्नोर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी मार्गदर्शनपर आपण वर्षभर आपले काम करत असतांना आपली अपार श्रद्धा असलेल्या ‘येडुमाते प्रति आपला भाव,प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षभरातील साठविलेल्या कुंजि पैकी काही आपल्या लाडक्या देवीच्या प्रति खर्च करुन तिच्या प्रति भाव प्रगट करतात.त्यासाठी पायी अनवाणी एवढे प्रचंड कडक उन असतांना देखील दल मजल करित हा दिंडी सोहळा चालतो.आजपर्यंत ही चाललेली परंपरा यशस्वीपणे राबवतात त्याबदद्ल भाविकांचे मनापासून स्वागत करण्यात आले.भिल्ल आदिवासी समाज हा क्रांतिकारी समाज आहे.देशाच्या विकासासाठी आदिवासी समाजाचे अनमोल असे योगदान आहे.आज समाजातील मुले,मुली यांनी शिक्षण घेवुन समाजाची आर्थिक,सामाजिक प्रगती करणे आवश्यक आहे.शिक्षणाशिवाय आपण प्रगती करु शकत नाही.म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे.ते दुध पिल्यानंतर गुर-गुरल्या शिवाय राहणार नाही’ असे म्हटले त्याप्रमाणे शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आपणास दिला.आपले मागासलेले लोक,समाजाची क्रांति करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.तसेच आपले मुलांवरती आदर्श संस्कार करुन एक नवीन पिढी घडवा.महाराष्ट्र हा थोर साधु-संताचा,राष्ट्रीय महापुरुषांचा आहे. समाजासाठी या साधु-संतानी,महापुरुषांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजाचे जनकल्याणा साठी समर्पित केले.त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची वेळ निर्माण झालेली आहे.समाज हा अध्यात्मापासुन खुप दुर चालला असुन आजचा तरुण युवक हा व्यसनाधिन बनत चाललेला आहे.त्यामुळे तरुण पिढी ही उध्वस्त होण्याचे मार्गावर आहे.तरुणांनी व्यसनाचे अधिन न जाता अध्यत्माकडे वळणे आणि थोरां मोठ्यांचा आदर,सन्मान राखणे खुप आवश्यक आहे तरच नवीन पिढी वाचू शकेल.आसे सांगितले.या कार्यक्रमासाठी श्री.भास्करराव खेमनर, ग्रामपंचायत सरपंच सौ.सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री .किसनराव खेमनर,श्री.रावजी भागा खेमनर चेअरमन,व्हाईस चेअरमन श्री.वाल्मिक खेमनर ,श्री.सुभाषराव हळ्नोर उपप्रमुख यशवंत सेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.त्यांचे सहकार्यातुन ‘येडुमाता’ भाविकांसाठी अन्नदान,पंगतीचे आयोजन केले होते.उपस्थित सर्व भाविकांनी अन्नदान पंगतीचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार सुभाषराव भालेराव,कर्पे याबरोबरच श्री.माणिक पवार,विष्णू बर्डे,संतोष बर्डे,बाळासाहेब बर्डे,श्रीकांत माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी भिल्ल आदिवासी समाजाचे युवक,अंभोरे ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!