पाठिंब्याने वाढतय वंचितचे पाठबळ :- उत्कर्षा रूपवते ;- आंबेडकर- जरांगे यांच्या एकत्रीकरणाने बदलणार समीकरणे !
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
शिर्डी लोकसभा मतदार संघांमध्ये अत्यंत भारदस्त असे प्रभावशाली, अनुभवी, सुशिक्षित असलेला
महिलेचा चेहरा म्हणून उत्कर्षा रूपवते यांचेकडे बघितले जाते. वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या नामांकनाच्या वेळी तोबा गर्दीचे शक्तिप्रदर्शनही दिसून आले. एक नवी चाहूल लागल्याने एक नवे पाऊल वंचितसाठी असे म्हणत अर्ज भरण्यापूर्वीच मराठा समाजाच्या काही तरूणांनी, पाठिंबा देत एक लाखाची देणगी दिली. तर आदिवासी समाज, मातंग समाज, धनगर समाज व शेतकरी संघटने बरोबरच
अनेक समाजाने उत्कर्षा रूपवते यांना जाहीर पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर त्यांना मिळणारी ताकद ही प्रतिस्पर्ध्यां करिता मोठे आव्हान ठरू पाहत आहे. दिवसागणिक वाढत जाणा-या पाठिब्याने मतदार संघात तर रीघ लागली आहे. संगमनेर येथील मणियार जमात शिक्षण फंड चे मुख्य प्रतिनिधी आयुब कादर, माजी उपाध्यक्ष हाजीपीर मोहम्मद मनियार , वसीम मणियार त्यांनी उत्कर्षा रूपवते यांची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीला समाजाने जाहीर पाठिंबा दिल्याने रूपवते घराण्याने त्यांचे आभार मानले. मुस्लिम समाजातील मनियार या समाज घटकाने जाहीर पाठिंबा दिल्याने हजार च्या घरात वाढत जाणारी शक्ती दोन्ही उमेदवारांना बेजार केल्याशिवाय राहणार नाही.
दिवसागणिक वाढत जाणारा पाठिंबा हा मतदानाच्या संख्येत निश्चित भर घालणारा असून विविध स्तरातून वंचितला मिळणाऱ्या पाठिंब्यांने तर माझे मनोबल वाढले आहे असे त्या म्हणाल्या. वाढता वाढता वाढे ते अधिकच वाढत असल्याने आता ही लढाई जनतेने आपल्या हातात घेतली आहे. कारण वंचित बहुजन आघाडी ही कोण्या एका व्यक्ती, घटक, अथवा समुहाची मक्तेदारी नाही हेच यातून सिध्द होत आहे. वंचित हा बहुजनाचा पक्ष आहे. वाढत जाणा-या बहुजणाच्या पाठबळाचे ते द्योतक आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस, शिंदे सरकार हाणून पाडू. फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांना आपण जाहीर पाठिंबा देऊ असे सांगत त्यांच्या या वक्तव्याने वंचित बहुजन आघाडीला एक प्रकारे नवसंजीवनी वआत्मिक बळ मिळाल्याने शिर्डी लोकसभा निवडणुकीत वंचित आणि जरांगे पाटलाच्या एकत्रीकरणातून एकूणच हे समीकरण बदलणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आता ही जिद्द मी पणाला लावली असून हा आयुष्याचा महत्त्वाचा डाव आहे. गेली पचवीस वर्ष जनसेवेचा घेतलेला वसा यातून मतदार संघाची हुकुमाची राणी राहणार असल्याचा दावा उत्कर्षा रूपवते यांनी केला. हर पत्ता नशीब में होता है। पत्ते फेकते नही, संभलकर रखते हैं। पत्ते अपने होने से डाव हासिल होता। जोकर ही मेकर बनता है। उसके साथी भी वैसे होने चाहिए। तभी जीत मुमकीन है। उत्कर्षा रूपवते वर मतदार संघात घरोघरी दारोदारी
औक्षण, पूजन, अनुभवी ज्येष्ठाचे आशीर्वाद, युवकाचा जोश, आप्त स्वकियांचे अक्षतरूपी आशीर्वादाचा धडाका लागला असून येथील जाणकार मतदार कदापि
माझी क्षती होऊ देणार नाही असा आशावाद रूपवते यांनी व्यक्त केला. हुकुमाची राणीच डाव पलटू शकते
आजी माजी आमदार खासदार हे आपणच शिलेदार असल्याचा आव आणतात परंतु त्यांचा डाव हा घडीचा होता. यावेळी आपली बाजूच नव्हे तर बाजीच आपली राहणार असून येथील जनतेच्या भावना संवेदना मी जाणून आहे. प्रतिस्पर्धी भलेही आम्हीच या मतदार संघाचे खासदार म्हणून मिरवत असतील पण
दावेदार मीच राहणार आहे. आता येथील जनतेला बदल अपेक्षित आहे. कारण मतदार संघात झालेली वाढ ही सुशिक्षित वर्गाची आहे. वंचित ही कोणा एका घटकाची, समाजाची मक्तेदारी नाही साईबाबाच्या दारी निघालेली वारी ही घरोघरी दारोदारी जाणार आहे. ना किसी से व्देष लोकशाही संविधान से चलेगा देश। ना किसी से कोई होड , अपनो के लिये मेरी है दौड । आंबेडकर और जरांगे पाटिल का ही रहेगा मोड।
*रूपवतेंनी मीडियाचे केले भरभरून कौतूक*
हल्ली मीडियावर चांगलीच आगपाखड केली जात आहे. काहीजण मीडियावर टीका करतांना दिसतात. तर दुसरीकडे उत्कर्षा रूपवते यांनी राहत्यामध्ये प्रिन्ट इलेक्ट्रॉनिक आदि
मीडियाचे भरभरून कौतूक केले. त्या म्हणतात. माणसाचे
कौतूक करा, त्यांच्या कामाचे कौतूक करा! आभार माना ! हा सकारात्मक विचारच माणसाला मारक नाही तर तारक ठरतो. तरच माणसाची प्रतिमा ही उत्कर्षा कडे घेऊन जाते. उत्तरेतून विजयाचे उत्तर देऊ असे त्या म्हणाल्या. उत्कर्षा रूपवते यांना मिळणारा प्रतिसाद,
मतदाराचा कौल हा प्रतिस्पर्ध्यांना फेल करेल हेच यातून प्रतिपादित होते.
