रणखांब येथील रस्त्याचं काम सुरू न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार – सरपंच बाबाजी शेठ गुळवे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील रणखांब गावच्या रस्त्याचं काम काही दिवसापासून प्रलंबित असून, वारंवार रणखांब गावचे सरपंच बाबाजी शेठ गुळवे यांनी पाठपुरावा करून देखील त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे, तर रविवार दिनांक 28 4 2024 रोजी सकाळी सरपंच यांनी विशेष ग्रामसभा बोलावली असून, त्या ग्रामसभेमध्ये लोकसभेचे विलक्षण होण्याअगोदर रस्त्याचे काम सुरू जर झाले नाही तर मतदानावर संपूर्ण गाव बहिष्कार टाकणार आहे असे देखील आवाहन सरपंच बाबाजी शेट गुळवे यांनी केल आहे. तर त्वरित या रस्त्याचे काम करावा अन्यथा रविवारी ग्रामसभेमध्ये जो निर्णय होईल त्यामध्ये तो निर्णय घेतला जाईल असं देखील सरपंच यांनी सांगितला आहे.
रस्त्याचे भूमिपूजन होऊन देखील अधिकारी फक्त ग्रामस्थांची दिशाभूल करत आहे, मग अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारे धाक आहे याची देखील दखल सरपंच घेणार आहे.
तर या निर्णया पाठीमागे संपूर्ण गावचा पाठिंबा सरपंच यांना आहे.
रणखांब येथील रस्त्याचं काम सुरू न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार – सरपंच बाबाजी शेठ गुळवे.
