आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या शिर्डी मतदारसंघाचा विकासासाठी काय करणार यावर बोलावे – नचिकेत खरात
 विकासात्मक ब्ल्यु प्रिंट घेवून मी मतदारासमोर जाणार 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
एका बाजूला चाकण दुसऱ्या बाजूला नगर तर तिसऱ्या बाजूला सिन्नर अद्योगिक वसाहती आहे मात्र या त्रिकोणात हा मतदार संघ असून ही शिर्डी मतदार संघात एम आय डी सी प्रतिनिधीत्व करणाऱ्याच्या हलर्जीपणामुळे निर्माण झाल्या नसल्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम लागले नाही परिणाम युवकांना घरदार सोडून बाहेर जावे लागत आहे तेव्हा या मतदार संघात नवउद्योक तयार करण्याचे आपले स्वप्न असून शेतकऱ्याच्या मालाला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळावे तसेच पर्यटनाला चालना मिळावी हे उद्देश ठेवून ” चला आता बदल घडवू हे ब्रीद वाक्य घेवून विकासात्मक ब्ल्यु प्रिंट घेवून लोकांसमोर जाणार असल्याचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नचिकेत रघुनाथ खरात यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले .
नचिकेत खरात पुढे म्हणाले की , 2009 पासून शिर्डी लोकसभा मागसवर्गियाकरिता राखीव झाला तेव्हा पासून यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली एकाने सभामंडपा व्यतिरिक्त काय ? दिले तर दुसरे बहुतांश फिरकलेचं नाही संधी असताना ही विकासाला चालना मिळाली नाही काहीच काम झाले नाही यासाठी आजी माजी खासदारांनी काहीच केले नाही  जर हे आपल्यासाठी काहीच करत नाही त्यामुळे तरुणांनी याची दखल घेणे गरजेचे आहे बदल घडवू या हे ब्रीद घेऊन मी शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवत असून कोणावरही टीका न करता मतदार संघाचा बदल घडवून आणून व विकासात्मक ब्ल्यू प्रिंट घेऊन जनते समोर जात आहे  या मतदार संघात सकारात्मक काम करण्याचा माझा विचार व संकल्प आहे
अकोलेसह मतदारसंघात बहुतांश ठिकाण निसर्गरम्य असून पर्यटन क्षेत्राला वाव मिळाला नाही तर काही ठिकाणी चांगले पर्यटन क्षेत्र असून त्याची मार्केटिंग करण्यात कमी पडल्याचे दिसत आहे संगमनेर तालुका जसा सहकारात अग्रेसर आहे तसेच कृषी क्षेत्रात अग्रेसर व्हावे म्हणून कृषीवर आधारिर कृषी प्रद्युसर कंपन्या सुरू करून  शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून द्यावा  राहता तालुक्यातील जगातील तिर्थस्थल आहे मात्र त्याचा म्हणावा असा विकास झाला नाही तर तो करू शकलो नाही शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळावर नाईट लँडिंग नाही त्यामुळे भाविकामध्ये निराशा आहे तेव्हा नाईट लंडिंग सुरू करण्याचा प्रयत्न करून तसेचं अद्योगिक वसाहत मंजूर करून बेरोजगारणा रोजगार उपलब्ध होईल कोपरगावमध्ये बारामही गोदावरी वाहते मात्र त्या भागात आजही टँकर सुरु आहे त्या लोकांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेल .
उमेदवारांनी नुसते आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या शिर्डी मतदारसंघाचा विकासासाठी काय करणार यावर बोलावे निळवंडे कालव्याच्या पाण्यावरून फक्त श्रेयवाद केला जात आहे मात्र  श्रेयवाद घ्या मात्र त्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडले जाते का ? ते शेतकऱ्यांच्या शेतात जाते की नाही हे महत्वाचे आहे आपल्या एखाद्या शक्तीबरोबर जायचे की विकासाबरोबर जायचे हे जनतेनेचं ठरवावे जनता आता हुशार झाली आहे त्यांना काय करायचे ते कळते .
शिर्डी मतदार संघात काय बदल करू शकेल हा विचार व संकल्प घेवून मी मतदारासमोर जात आहे मुले शिक्षण घेतात मात्र शिक्षण झाल्या नंतर पुढे काय हा प्रश्न तरुणांसमोर आहे आम्ही पंधरा वर्षे तुम्हाला संधी दिली त्या पंधरा वर्षे काय केले याचा जाब मतदारांनी त्यांना विचारावा तर  काँग्रेसला पाठबळ देण्याचे काम  मातंग समाजाने केले आहे मात्र त्या काँग्रेसने आमचा फक्त कार्यकर्ता म्हणून वापर केला .आतापर्यंत कोणाला ही प्रतिनिधित्व दिले नाही ज्या ठिकाणी आंदोलने करायचे त्यासाठी मातंग समाजाचा वापर केला गेला मात्र प्रतिनिधित्व द्याचे तेव्हा राजकीय पक्ष का कचरतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!