कै.विष्णू कुदळ दैवत आमचे = भाऊसाहेब कुदळे सर
एक आदर्श पितृ तुल्य हरपले!..
कष्टातुनी संसार फुलविला,उरली नाही साथ आम्हांला!..
आठवण येते क्षणा-क्षणाला !आजही पाहतो आम्ही तुमची वाट, यावे तुम्ही पुन्हा जन्माला!…
कै.विष्णू गेणू कुदळ यांचा जन्म शेतकरी कुटुंबात कै.गेणू कुदळ आई सौ. यांचे पोटी सन 1945 रोजी विष्णू कुदळ यांचा जन्म संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे झाला.वडिल शेतकरी असल्यामुळे विष्णू कुदळ हे देखील शेती करण्याचा निर्णय घेउन शेती सुरु केली.प्रथमापासुन कै.विष्णू कुदळ हे शांत,संयमी,मनमिळाऊ विनम्र स्वभाव आणि कष्टाळू वृती यामुळे ते नेहमी आपले शेती कामात मग्न असे.त्यांचा प्रामाणिक नेहमी खरे बोलणे,हा स्पष्ट बोलणे.जे काही बोलायचे ते तोंडावर बोलणे हा त्यांचे स्वभावाचा एक विशेष पैलू होता.घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आणि हलाखिची यामूळे शेतीत काम ,मेंढपाळ,गोपालन करुन प्रसंगी रोजनदारीचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.घरात सर्वात मोठे असल्याने आणि परिस्थिती गरिबीची असल्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करायचा, कुटंबातील पालन पोषणाची सर्वस्वी जबाबदारी यांच्यावर असल्याने शिक्षण घेता आले नाही.आणि परिस्थिती गरिबीची यामुळे शिक्षण घेता आले नाही. पुर्वीच्या काळी एकत्रित कुटूंब पध्दती असायची त्यामुळे कुटंबातील सर्व सदस्यांचा मान सन्मान राखत सर्वांना एकत्र सांभाळायचे महत्वाचे काम करायचे.घरातील बाकी भाऊ यांचेकडे वेग-वेगळ्या जबाबदा-या असल्याने घरची पुर्ण शेतीची कामे ही प्रामुख्याने विष्णू कुदळ यांचेकडे असायची.शेती करतांना उच्च प्रतिचे बियाणे वापरून एक उत्कृष्ठ शेती करण्याचा त्यांचा पंचक्रोशीत बोल-बाला असे.740 या जातीचे ऊसाचे विक्रमी उत्पादन घेण्याचा मानही त्यांनी मिळविला.पुढे वत्सलाबाई हिच्याशी विवाह झाला.त्यांचे शिक्षण जुनी सातवी होती.कुटुंबाचा गाढा ओढण्याची जबाबदारी विष्णू यांचे कडे होती.त्यामुळे नोकरी करण्याची खुप इच्छा परंतु एकत्रित कुटूंब यामुळे नोकरी करता आली नाही.त्यांनी देखील आपले पती विष्णू कुदळ यांना घरातील सर्व कामे बघुन शेती कामात मदत करुन,गुरे सांभाळणे इ .कामे करायची.पत्नी वत्सलाबाई यांनी देखील आपल्या कुटंबातील सदस्यांचा मानसन्मान ठेवत पती विष्णू कुदळ यांचे प्रत्येक सुख,दु:खांत सहभागी होत असे.कितीही कामाची जबाबदारी पडली तरी त्याबाबत कधी घरात तक्रार केली नाही.त्यामुळे घरातील बाकी सदस्य देखील या दोघांचा आदर सन्मान ठेवत. कुटुंबाचा हा गाढा ओढतांना जिवनात अनेक संघर्षमय चढ-उतार यांचे वाट्याला आले.परंतु मागे हटले नाही.हटतील ते विष्णू पाटील कसले ?त्यांनी कधीही आयुष्यात हार पत्करली नाही.त्यांना 1970 साली पुत्र रत्न प्राप्त झाले.त्यांचे नाव भाऊसाहेब!..मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!..याप्रमाणे अतिशय शांत,संयमी,जिद्दी,कष्टी,सुसंस्कृत मनमिळावू स्वभाव असलेला भाऊसाहेब!..वडिलांचे चांगले संस्कार यामुळे भाऊसाहेबांना घडविण्यासाठी आई वत्सलाबाई आणि वडिल विष्णू पाटील यांनी मोठी प्रयत्नाची पराकाष्टा केली.भाऊसाहेब हे देखील वडिलांना शेती कामात मदत करत त्यामुळे त्याची कामात असलेली धडपड पाहुन कधी-कधी खुप वाईट वाटत.त्यानी हे कष्ट करु नये.आपण करत असलेली अवघड शेतीची कामे ही आपल्या मुलांना जमणार नाही.त्यांची जीवनाची वाताहत होवू नये म्हणून शिक्षण हा तिसरा डोळा आहे.शिक्षणाने माणुस प्रगती करु शकतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ते ऐकुन होते आणि अशा महापुरुषांच्या विचाराचा पगडा त्यांच्या मनावर झाला.शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे.एकदा की हे ज्याने दुध पिले की,तो गुर-गुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलगा भाऊसाहेब यास शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.इयत्ता 4थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले.इयत्ता पाचवी साठी मल्हरराव होळकर विद्यालयात प्रवेश घेतला.घरची एकत्रित कुटूंब त्यातच परिस्थिती गरिबीची त्यामुळे शिक्षणासाठी अडचणी निर्माण झाल्या.भाऊसाहेबांच्या वाट्याला हा संघर्ष येवू नये म्हणून भाऊसाहेबांच्या शिक्षणाची काळजी वाटू लागली.माझ्या वाटेला आलेला संघर्ष हा मुलाच्या वाट्याला येवू नये म्हणून भाऊसाहेबास चांगले शिक्षण देण्याचा निर्णय वडिलांनी घेतला.अशा वेळी पारनेर येथिल मेहुने स्व.खंडु बाबुराव जाधव यांचेकडे भाऊसाहेब यांस शिक्षणासाठी पाठविले.तिथे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आणि इयत्ता अकरावी साठी संगमनेर कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.घरची परिस्थिती आर्थिक बेताची असतांना अनेक अडचणी शिक्षणासाठी आल्या परंतु घरची परिस्थिती आणि वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी करत असलेले रोजचे कष्ट बघुन डोळ्यात पाणी येत होते.वडिलांचे कष्ट करण्याची ही वृत्ती भाऊसाहेबां जीवनाची एक गुरु किल्ली मिळाली आणि शिक्षण घेत असतांना वडिलांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवुन अखेर एवढ्या कठीण परिस्थितीत कसे बसे बी.ए.पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.पुढे बी.एड.केले.संगमनेर येथिल नामांकीत अशा सह्याद्री शिक्षण संस्थेत शिक्षकांची नोकरी मिळाली.आणी शिक्षक म्हणून 1996 साली शिक्षक म्हणून नोकरीचा श्रीगणेशा केला.प्रामाणिक,उत्तम अध्यापन कला यामूळे संस्थेत नावलौकिक मिळविला.एक वर्षानी अंभोरे येथिल मल्हरराव होळकर उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे सन 1997 पासुन ते आजतागायत 27 वर्ष इमाने,इतबारे सर्व सहकारी यांचे समवेत अंभोरे आणि पंचक्रोशितील गरिब,आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या,विद्यार्थी,विद्यार्थिनी यांना आदर्श विद्यार्थी घडवायचे त्यांना ज्ञानदान देण्याचे कार्य अखंडपणे चालू आहे.आपण ज्या परिस्थितीतून गेलो त्या परिस्थितीची जाणीव इतर विद्यार्थ्यांना करुन देत प्रसंगी गरिब,गरजुंना आर्थिक मदत शिक्षणासाठी करतात.मुलगा शिक्षक बनून त्याचे चालू असलेले कार्य हे कानावर पडताच कै.विष्णू कुदळ यांचे चेह-यावर एक वेगळा आनंद दिसत असे.मी एक मुलगा चांगला शिक्षक केला याचा मोठा अभिमान त्यांना असायचा.कितीही काबाडकष्ट केले थकवा आला की.मुलगा भाऊसाहेब यांचेकडे बघुन थकवा जायचा.कारण याच कष्टातुन मुलगा शिक्षक झाल्याचा खुप आनंद त्यांना झाला.असेच संसार रुपी जीवनाचा रथ चालवीत असतांना दि. 26/06/2023 रोजी त्यांच्या जीवनाची आगगाडी, सुख आणि दु:खाची, अनेक स्टेशन घेत-घेत निराशेचा धुर सोडत,अखेर मृत्युंच्या प्लेटफार्मवरती कायमची येऊन थांबली…विष्णू कुदळ यांनी अखेरचा श्वास घेतला.आणि कुदळ परिवाराचा अखेरचा निरोप घेतला.कुदळ परिवाराचा खरा पोशिंदा या जगातुन कायमचा दुर निघुन गेला.त्यामुळे कुदळ परिवारावर मोठा अघात झाला.त्यांची अपूर्ण असलेली स्वप्न मुलगा भाऊसाहेब हे निश्चित पुर्ण करतील अशी अपेक्षा करतो.त्यांना या परिवारातून आज जावुन बरोबर एक वर्ष होत आहे.परंतु अद्यापही त्यांच्या कार्याच्या पाऊल खुणा या जिवंत आहे.आम्हांला ते आमच्यात नाही असे वाटत नाही.ते कार्याने अदृश्य रुपात आमच्यात असल्याची भावना सदैव प्रेरणा देत राहिल.
त्यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन!????