सह्याद्री महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा जनजागृती अभियान !

“व्हाईस ऑफ मिडिया संगमनेर तालुक्यातील संघटनेचा उपक्रम”

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

सायबर सुरक्षा व गुन्हेगारी विद्यार्थ्यांना जेवढी महत्वाची आहे. तितकीच शिक्षकांनी समजून घेणं आवश्यक आहे, सायबर गुन्हेगारी हा विषय खूप व्यापक झाला आहे, सायबर गुन्हेगारीला बळी पडु शकतो असे साधन म्हणजे मोबाईल आपल्या सर्वांचाच हातात आहे, आपण सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग करण्यास फार उत्साही असतो म्हणून यांचे वाईट अनुभव अनेकांना येतात. त्यामुळे आपण सर्वांनी यापासून सावध राहिले पाहिजे असे आवाहन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले.

सोशल मिडिया च्या युगात सायबर सुरक्षा, सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ यास बळी पडणारे महाविद्यालयीन विद्यार्थी यामुळे होणारी मानसिक व आर्थिक हाणी यावर जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ‘व्हाईस ऑफ मिडिया संगमनेर तालुका ‘ या पत्रकार संघटनेच्या वतीने सह्याद्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या व्याख्यान संगमनेर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक श्री. देशमुख म्हणाले, स्मार्टफोन, इंटरनेट, हॅकिंग, काॅलसेंटर वरुन येणारे फोन या द्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडतात याला सर्वस्वी जबाबदार आपण स्वतः असतो, आधार कार्ड, पॅनकार्ड, ओटीपी पासवर्ड कोणालाही शेअर करु नये. तसेच सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात अडकल्यास बाहेर पडणं मोठं अवघड असतं, काही समाजकंटक विकृत बुद्धीचे असतात ते लोक दोन समाजात तेढ निर्माण करतात, पोस्ट शेअर करणारा ही तेवढाच गुन्हेगार असतो म्हणून आशा घटना तात्काळ सायबर सुरक्षेच्या टोल फ्री क्रमांक १९३० वर संपर्क साधावा असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

व्हाईस ऑफ मिडिया चे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी संघटनेची ध्येय धोरणे, विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यापुढेही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिल असे आश्वासन दिले आहे.
सह्याद्री महाविद्यालयाचे प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी सर्व पत्रकांराचे स्वागत केले. आभारप्रदर्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडु यांनी केले.
व्यासपीठावर उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख, सचिव अमोल मतकर, खजिनदार गोरक्षनाथ नेहे, सह सचिव भारत रेघाटे, संजय अहिरे, अर्जुन अरगडे, सचिन जंत्रे, सुभाष भालेराव, नवनाथ गाडेकर, सुकदेव गाडेकर,महेश पगारे, नवनाथ वावरे, शाविद शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!