बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नसबंदी करावी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आ अमोल खताळ यांनी केली मागणी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यात मानवावर बिबट्याचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या बिबट्यांची तात्पुरत्या स्वरूपात नस बंदी करण्यात यावी अशी मागणी महा युतीचे आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे
संगमनेर तालुक्यामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे तसेच गिनी गवत व मकाचे प्रमाण मोठ्या प्रमा णात आहे त्यामुळे बिबट्याला लपण्या साठी जागा उपलब्ध झाली आहे त्यामुळे बिब ट्यांची संख्या वाढत चालली असून सातत्याने नागरिकांवर या बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाणही वाढत आहे त्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिक जखमी आणि मृत झालेले आहेत. हे थांब विण्यासाठी बिबट्यांची तात्पुरत्या स्वरू पात नसबंदी करण्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात याव्यात अशी मागणी संगमनेरचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे त्यावर योग्य ती कार्यवाही करत उपाययोजना केल्या जातील असा विश्वास उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!