*राज्यात सात वर्षानंतर दुर्गम, अतिदुर्गम भागातून सुगम भागात शिक्षकांच्या बदल्या, शासन, प्रशासनाचे मानले आभार…*
*अहिल्यानगर – लोकवेध live न्यूज
आज 07.08.2025 रोजी राज्यस्तरीय बदली हवी टीमने संगमनेर विधानसभा मतदार संघाचे सन्माननीय आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन जिल्हांतर्गत बदल्या पूर्ण होऊन कार्यमुक्ती होण्यासंदर्भात निवेदन दिले. या प्रसंगी मा. आमदार साहेब यांच्या सोबत बदल्यांची चालू असलेली प्रोसेस व कार्यमुक्ती ची आवश्यकता याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामविकास विभाग शासन निर्णय 18.6.2024 नुसार सध्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतून शिक्षकांच्या सध्या विन्सिस मार्फत ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल्या चालू आहेत. संवर्ग एक संवर्ग दोन व संवर्ग तीन यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यांना शाळाही मिळालेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेकडो अडचणीतल्या महिला शिक्षकांसह इतर शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. आता पुढील संवर्ग चार मधील बदलीपात्र शिक्षकांचे सध्या फॉर्म भरणे चालू आहे. यानंतर विस्थापित चा टप्पा चालू होईल. या सर्व बदल्या व्यवस्थित पार पाडून कार्यमुक्ती व्हावी व सर्व शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती बदली हवी टीमच्या वतीने आमदार साहेबांना करण्यात आली. सदर बदल्यांमध्ये ज्या शाळेवरील शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शाळेत नव्याने शिक्षक जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही असे म्हटले आहे. साहेबांनी दुर्गम, अतिदुर्गम, पेसा भागात काम करत असलेल्या महिलांचे म्हणणे सविस्तर ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला व निवेदनावर कार्यवाही करण्याचे आश्वासन बदली हवी टीमला दिले. सात वर्षानंतर अवघड, दुर्गम, अतिदुर्गम, पेसा भागातील महिला शिक्षकांसह इतर शिक्षक सुगम भागात येत आहेत, हा खऱ्या अर्थाने या शासन निर्णयाचा आत्मा आहे. जसे जसे सीनियर होऊ, तसे तसे या बदल्यांमध्ये सेवाज्येष्ठता वाढून सोयीने बदल्या होतात. अशाच ऑनलाईन बदल्या कायम झाल्या पाहिजेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब, ग्रामविकासचे मुख्य सचिव मा.एकनाथ डवले साहेब, उपसचिव नीला रानडे मॅडम, बदल्यांचे कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन मॅडम व ग्रामविकास अधिकारी, विन्सिस कंपनीचे प्रमुख तसेच शासन, प्रशासनाचे बदली हवी टीमच्या वतीने आभार मानण्यात आले. याप्रसंगी राज्यस्तरीय बदली हवी टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे, बाळू गुंजाळ, सुनिल डेरे, संतोष दळे, राहुल गायकवाड , दिगंबर वाकळे, बाळासाहेब आरोटे , बाळासाहेब कवडे , विलास घुले , सोमनाथ आंबरे , अनिल गुंजाळ , अण्णासाहेब कानवडे ,रावसाहेब शिंदे , बाळु दिघे , अनिता नेहे , मेघाली बच्छाव , मिना गुंजाळ ,दिपाली रेपाळ , अश्विनी येडे ,उज्वला गुंजाळ , सुरेखा गोडे , निता सावंत यांसह मोठ्या संख्येने शिक्षक व महिला शिक्षीका उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्या चालू असून सदर बदल्या ह्या मानवी हस्तक्षेप विरहित व पारदर्शक आहेत त्यामुळे सर्व शिक्षकांकडून या बदलांचे स्वागतच होत आहे. या बदल्यानुसार शिक्षक जसे जसे सीनियर होत जातात, तसे तसे ते सुगम भागात येतात. त्यामुळे भविष्यातही ऑनलाइन बदल्या चालू राहाव्यात, अशी शासन व प्रशासनास विनंती आहे. या बदल्या अतिशय चांगल्या असून नियोजनही चांगले आहे. महाराष्ट्रात अवघड क्षेत्रातील तसेच दुर्गम, अतिदुर्गम, पेसा भागातील महिला शिक्षिकांसह इतर हजारो शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. तसेच या बदल्यांमध्ये जे शिक्षक अवघड क्षेत्रात जातील, त्यांच्या 3 वर्षानंतर पुन्हा सुगम क्षेत्रात बदल्या होतात. हे फिरते चक्र चालू राहते. त्यामुळे या ऑनलाईन बदल्यांविषयी शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ज्ञानेश्वर बाळासाहेब सोनवणे, अहिल्यानगर.
बदली समर्थक तथा याचिकाकर्ते,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बदली हवी कृती समिती.
