स्पर्धा नव्हे व्यक्तिमत्व घडवण्याचा सोहळा – साथी विनय सावंत
स्वच्छ विचारांची प्रेरणा आणि वकृत्व कौशल्याचा महोत्सव
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आदिवासी व श्रमिकांचे ज्वलंत नेते, थोर समाजप्रबोधनकार साथी भास्करराव दुर्वे (नाना) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय ४२वी वक्तृत्व स्पर्धा काशेश्वर विद्यालय, कासारा दुमाला येथे उत्साहात पार पडली.
पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे साथी विनय सावंत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हणाले, “वक्तृत्व स्पर्धा ही केवळ बोलण्याची कला नसून आत्मविश्वास वाढवणारी आणि व्यक्तिमत्व घडवणारी महत्त्वाची दिशा आहे.” तसेच त्यांनी दिवंगत दुर्वे नानांच्या स्वच्छ विचारांच्या, प्रखर नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या स्पर्धेचे आयोजन राष्ट्र सेवा दल आणि साथी भास्करराव दुर्वे नाना स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले होते. तब्बल २५६ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वक्तृत्वकौशल्याची जादू सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ अवसक यांनी भूषविले. यावेळी सिताराम राऊत, गोपीनाथ घुले, बाळासाहेब गायकवाड, भाऊसाहेब शिंदे, नम्रता पवार, सुनिता पगडाल, पूनम मदने, पी.डी. सोनवणे यांसह मान्यवर, परीक्षक, स्पर्धक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध गटांतील प्रथम पाच विजेत्यांना स्मृतिचषक, पुस्तके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गटनिहाय विजेते पुढीलप्रमाणे :
- गट १ (इ. ३री-४थी) : समर्थ संदीप चव्हाण (प्रथम), अनन्या जयसिंग लामटुळे (द्वितीय), अनुष्का सुदाम उकिर्डे (तृतीय)
- गट २ (इ. ५वी-६वी) : वेदिका संतोष गडाख (प्रथम), रिदिमा राहुल देशमुख (द्वितीय), वैष्णवी रामा आहेर (तृतीय)
- गट ३ (इ. ७वी-८वी) : श्रावणी कैलास दिघे (प्रथम), अनुष्का रामनाथ वाळे (द्वितीय), वेदांत अनिल वाकचौरे (तृतीय)
- गट ४ (इ. ९वी-१०वी) : सांगळे नमिता मंगेश (प्रथम), दिवेकर साहील राजेंद्र (द्वितीय), पोखरकर वेदा भागवत (तृतीय)
- गट ५ (इ. ११वी-१२वी) : पवार पूजा सुदाम (प्रथम), राऊत ज्ञानेश्वरी सुदाम (द्वितीय), कोटकर श्रावणी दिपक (तृतीय)
- खुला गट : पर्बत निलेश दत्तात्रय (प्रथम), नाईकवाडी ज्ञानेश्वरी अरविंद (द्वितीय), एरंडे उत्तम गणपत (तृतीय)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख सोमनाथ मदने यांनी, सूत्रसंचालन संजय जेडगुले यांनी तर आभार प्रदर्शन सुखदेव इल्हे यांनी केले.
ही स्पर्धा केवळ विजेते निर्माण करणारी नव्हे, तर आत्मविश्वास, विचारशक्ती आणि समाजभान घडवणारी अमूल्य शाळा ठरली
