पाणीदार मंत्री बी.जे. खताळ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन – शुभम देशमुख यांचा गौरवोद्गार”

पिंपरणे / लोकवेध live न्यूज

माजी मंत्री स्व. बी.जे. खताळ पाटील हे कडक शिस्त, कमालीची तत्त्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यात विशेष ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यकाळात सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे अशा महत्त्वाच्या खात्यांचा त्यांनी यशस्वी कारभार पाहिला. प्रत्येक खात्यावर त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली होती. त्यांच्या काळात राज्यात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली. कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, पुण्याचे चासकमान, नांदेडचे विष्णुपुरी तसेच राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे श्रेय त्यांना जाते, असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे स्व. बी.जे. खताळ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभम देशमुख बोलत होते. पिंपरणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख, शिवराम वाकचौरे अरुणसाहेब देशमुख सुरेश ठोंबरे भीमा राहींज राजेंद्र काळे उत्तमनाना राहींज किसन साळवे बाळासाहेब साळवे रामनाथ काळे गोरक्षनाथ कर्पे ढमक महाराज रवींद्र देशमुख पिंटू खंडागळे परसराम काळे राजू बागुल त्रिंबकगिरी गोसावी प्रकाश वाकचौरे रामभाऊ साळवे संचित भारती सचिन खंडागळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशमुख पुढे म्हणाले की, “स्व. खताळ पाटील हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे साक्षीदार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पाणीदार मंत्री म्हणून त्यांची ओळख राज्यभर होती. संगमनेर तालुक्यात सहकार चळवळ रुजविण्याचे श्रेय त्यांना जाते. पिंपरणे गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान अमूल्य असून साहेबांचे कार्य कधीही विसरता येणार नाही.” या कार्यक्रमाचे आयोजन विक्रमसिंह खताळ पाटील मित्र मंडळ शुभम देशमुख मित्रपरिवार व पिंपरणे ग्रामस्थ यांनी केले होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!