जनसेवा फाउंडेशनच्या पुढाकारातून महिला बचत गटांना स्वावलंबनाची दिशा
कोळवाडे गावातील राजमाता महिला आदिवासी बचत गटाला पिठाची गिरणी, मसाले कांडप यंत्र तसेच वजन काटा देण्यात आला. 
संगमनेर 
मालुजे येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात महिला बचत गटांना उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महिला बचत गटांना पिठाची गिरणी, मसाले कांडप यंत्र तसेच वजन काटा देण्यात आला. कोळवाडे गावातील राजमाता महिला आदिवासी बचत गट यांना हे साहित्य प्रदान करण्यात आले.
या साहित्याचे वितरण लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या पत्नी नीलम ताई खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी उद्योगाकडे वळून कुटुंबाचा आर्थिक भार कमी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मांलुजे गावचे सरपंच संदीप घुगे तसेच जोर्वे गावचे लोकप्रिय सरपंच गोकुळ दिघे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तसेच महादू गोंधे व दत्तू तारडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोळवाडे येथील राजमाता महिला बचत गटाला हे साहित्य मिळू शकले.
या उपक्रमामुळे महिला बचत गटांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असून स्थानिक पातळीवर उत्पन्नवाढीस चालना मिळणार आहे. ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी जनसेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या सदस्यांसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!