सायकल चलाओ स्वास्थ बढाओ मोहिमेचा प्रारंभ
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
वाढती रहदारी,वाढते ध्वनी व वायु प्रदुषण वाढते अपघात यातून नाशिक करांना मुक्ती मिळावी यासाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी सायकल चा वापर करावा म्हणून रेल्वे डाक सेवेचे कर्मचारी रत्नाकर शेजवळ यांनी आज पासून “सायकल चलाओ स्वास्थ बढाओ” हा संदेश देत सायकल रैली सुरू केली आहे .
त्यांना याप्रसंगी शुभेच्छा देताना रेल्वे डाक सेवेतील कर्मचारी उप अभिलेख अधिकारी, निलिमा शिरोडे,प्रतिभा जमदाढे,वर्षा हर्डिकर,श्रीकांत महाजन ,फिरोज तडवी व कर्मचारी बंधू भगीनी उपस्थित होते .रत्नाकर शेजवळ हे गरूडझेपचे डाॕ. संदीप भानोसे सरांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करीत असुन, गरूडझेप परिवाराकडून देखील त्यांना या मोहीमेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.