विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करायला हवे – पोलिस निरीक्षक धनंजय जाधव

निमगाव जाळी / लोक वेध live न्यूज /अशोक गोसावी 

 

समाजात सध्या अनेक गुन्हे घडत आहे. याला कारण म्हणजे मोबाईलचे वाढते प्रमाण तसेच मोबाईलवर वापरले जाणारे चॅटिंगचे माध्यमे याला कारणीभूत आहे. यासाठी आपण मोबाईलचा वापर कमी करायला पाहिजे,कारण मोबाईल हे एक दुस-याच्या जाळ्यात फसण्याचं साधन आहे.कारण आजच्या या सोशल मिडियाच्या दुनियेत कोणतीही अनोळखी व्यक्ती आपल्याला कुठल्यान् कुठल्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करु शकते.त्यामुळे मुलांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. म्हणजे गुन्हागिरीचे प्रमाण कमी होईल. खरंतर कायदा आपणच तयार केला आहे;त्यामुळे कायद्याचं पालन करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन राहुरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे केले.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व थोर स्वातंत्र्यसेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी युवानेते पंकज कडू पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जयभाये, पोलीस कर्मचारी देविदास कोकाटे जेष्ठ पत्रकार सुनिल सात्रळकर, संभाजीराव कडू,शकुरभाई तांबोळी, प्राचार्या सुशिला थोरात, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता निबे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विलास गभाले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!