धामोरी ग्रामस्थांच्या वतीने कृषीदुतांचे स्वागत

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

धामोरी बु. राहुरी जिल्हा अहमदनगर येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले. हे कृषिदूत ग्रामीण जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी येथे आलेले असून,डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय विळद घाट येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत ठलाल रोशन, शिंदे संकेत, झेंडे क्षितीज, सगळगिळे तन्मय, सातपुते ओंकार यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकन्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतातील माती परिक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती बीजप्रक्रिया, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, शेतातील अवजारांचा वापर शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. या उपक्रमातून आधुनिक शेतीला नवी दिशा मिळेल तसेच, वेळोवेळी विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकन्यांमध्ये जनजागृती करणार आहोत अशी ग्वाही ग्रामस्थांना कृषीदुत यांनी दिली. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. राऊत, प्रा. डॉ.एच एल शिरसाठ, प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. बी. व्ही. गायकवाड ,प्रा. ठोंबरे मॅडम आणि प्रा. खेडेकर सर, प्रा. मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सरपंच अशोक रामदास बकरे, ग्रामसेविका प्रमिला केदारी, कृषीदूत इ. उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!