४० वर्षानंतर विखे पाटलांच्या बाल्लेकिल्यात शरदराव पवार
खाजगी कार्यक्रमात शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
आश्वी | लोकवेध live न्यूज
४० वर्षानंतर विखे पाटलांच्या बाल्लेकिल्यातील आश्वी व ४० गांव परिसरात शरदराव पवार , बाळासाहेब थोरात हे नवीन वर्षाच्या मुर्हुतावर आज मंगळवार दि २ जानेवारी २०२४ रोजी खाजगी कार्यक्रमानिमित्त आश्वीत येणार असल्याने आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत निवडणुकीची चाचपणी करत रणशिंग फुकण्याची शक्यता ? असल्यानेचं यातून कार्यकर्त्यामध्ये नवसंजीवनी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शरदराव पवार काय बोलणार यांची उत्सूकता परिसराला लागली आहे .
आश्वी बु॥ हे गाव तसे ऐतिहासिक व चळवळीचे गांव असून व्यापारीक क्षेत्रात अग्रगणी असल्याने राजकिय , सहकार , सामाजिक क्षेत्राची सुरुवात येथूनचं झाले असून थोरात – विखेच्या सानिध्यातले राजकिय वलयांचे निर्माण झालेले गांव याचं गांव १९८४ ला पुरवठा योजनेसह विविध विकास कामांच्या उट्रघाटन प्रसंगी आले होते .त्यावेळी शरदराव पवार यांनी पुलोदचा प्रयोग केल्याने अहमदनगर जिल्हयातील सहकार क्षेत्रातील नेते हे दोन कॉग्रेस पक्षात विभाजीत झाले होते तेव्हा पासून पवार – विखे स्पर्धेकच राहिले आता जरी राजकिय समिकरणे बदलली असून आश्वीच्या वलयातील एक नेते भाजपात तर दुसरे नेते कॉग्रेसमध्ये कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रवादीचे नेते ! मात्र राजकारणातील भीष्म असणारे पवार साहेब एका खाजगी कार्यक्रमानिमित्त निमित्ताने आश्वीत येत असल्याने काही लोकांना विश्वास पटेना मात्र हे सत्य आहे . याच अनुषगांने आश्वी व परिसरात कार्यक्रमाची जोरदार तयारी होताना दिसत आहे . राजकारणात गुगली टाकण्यात शरदराव पवार माहिर असल्यानेचं या कार्यक्रमातून कोणती राजकिय गुगली टाकली जाईल यांचा नेम नाही . तसेच शिर्डी मधून अनेक राजकिय पक्षाने , नेत्यानी निवडणुकीचे रंणशिंग फुकल्याचे दिसून आले हे लक्षात घेऊनचं शरदराव पवार यांनी राष्ट्रवादीचे शिर्डीमध्ये शिबिर आयोजित केले असल्याचे बोलले जात आहे . शिवाय फुटीपूर्वी नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पक्षाचे ६ आमदार जिल्ह्यात होते. मात्र फुटीनंतर अजितदादा गटाकडे ४ तर शरद पवार गटाकडे २ आमदार राहिले आहेत. जिल्हा पुन्हा ‘शरद पवार यांच्या प्राबल्याखाली आणण्यासाठी या शिबिराचा उपयोग केला जाणार आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेश शिबीरही शिर्डीमध्ये झाले होते. आठवले गटाचे शिबिरही शिर्डीमध्ये झाले होते. या दोन्ही शिबीरातून लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा झाली . मग राष्ट्रवादीच्या शिबिरातून कोणाची चर्चा होणार . कारण पवार साहेब कोणाला , कधी , कशी संधी देतील हे सांगत येत नाही सध्याची राजकीय परिस्थिती, शेतकरी-महिला-तरुण -विद्यार्थी-उद्योजकांचे होणारे हाल, सरकारला विसर पडलेली लोकशाही मूल्ये व सध्या संविधानाचे होत असलेल्या अवमूल्यन यासह पक्ष संघटनेचे सक्षमीकरण, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी करावे लागणारे नियोजन, अशा विषयांवर शिबिरात विचारमंथन होणार असल्याचे दिसून येत आहे
.यावेळी देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे ,मा. खासदार बापूसाहेब तनपुरे ,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मा. आमदार डॉ सुधीर तांबे ,माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, रावसाहेब नाथाजी म्हस्के, आमदार रोहित पवार, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, अरुण पाटील कडू, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव पा.खेमनर, गीताराम गायकवाड, डॉ जयश्रीताई थोरात , विजयराव वाकचौरे ,अशोक गायकवाड, माणिकराव यादव , सुरेंद्र थोरात श्रीकांत भालेराव , दिपकराव गायकवाड , विजय हिंगे , राहुल ज-हाड , पप्पू बनसोडे , आशिष शेळके , कैलास कासार , योगेश मुन्तोडे , विजय हिंगे , राजेंद्र चकोर , यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आरपीआयचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
