ज्ञान अवगत करण्याचे सामर्थ्य मातृभाषेतच- अॅड.के.बी.हांडे.
महालक्ष्मी विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज
मराठी भाषा आपली आई आहे.हिंदी भाषा मावशी तर इंग्लीश भाषा ही मैत्रीण आहे. रोजची गरज आईच पुर्ण करेल.त्यामुळे माय मावशीला विसरू नका.मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम शिक्षण आहे.ज्ञान अवगत करण्याचे सामर्थ्य हे मातृभाषेतच असल्याचे विचार अॅड.के.बी.हांडे यांनी प्रतिपादीत केले.
अगस्ती रुरल एज्युकेशन सोसायटीचे महालक्ष्मी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी मार्गदर्शन करताना अॅड.हांडे विचारमंचावरून बोलत होते.
याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर हे होते.
यावेळी ह.भ.प.शास्त्री महाराज,अॅड.ज्ञानेश्वर काकड, अॅड. ऐश्वर्या डेरे,प्रांजली कळमकर,नगरसेवक प्रमोद मंडलिक,प्रतिभा मनकर,माजी सभापती मारूती मेंगाळ,सरपंच लक्ष्मण सोंगाळ,दिपक पथवे,उपसरपंच मारूती काळे,प्रकाश कासार,माजी सरपंच भाऊसाहेब कासार,बबनराव आभाळे,संपतराव लगड,विजय गायकवाड,पोलिस पाटील चंद्रभान लगड,स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारूती आभाळे,जालिंदर धुमाळ,सदस्य अलका आभाळे,सुमन आढळ,नवनाथ जाधव,प्राचार्य सुनिल धुमाळ,शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन अण्णासाहेब ढगे,राज्यपंच अनिल चासकर यांसह पालक,विदयार्थी उपस्थित होते.
अॅड.हांडे यांनी पुढे मार्गदर्शन करताना.कर्तुत्व सिद्ध करा.स्वतःची ओळख निर्माण करा.स्त्री जन्माचे स्वागत करा.कायदयाची ओळख पाहीजे.त्यासाठी ज्ञानदान व न्यायदान दोन्ही महत्त्वाचे आहेत.बाहेरून वारकरी,पुढारी होण्यापेक्षा आतून बना.व्यसनापासून दुर रहा असे विचार व्यक्त केले.
अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर यांनी संधीचे सोने करा.कारण चांगल्याच नैपुण्याचे कौतुक होते.शैक्षणिक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.याचे सर्व श्रेय ग्रामस्थांचे आहे.विदयार्थांना चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण देणे महत्त्वाचे असून व्यावसाय अभ्यासक्रम महत्त्वाचा असल्याचे विचार व्यक्त केले.
ह.भ.प.शास्त्री महाराज यांनी ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तो जगाला उद्धारी.याप्रमाणे आपण समाजाचे देणे आहोत.हे विश्वची माझे घर याप्रमाणे जिवन जगता आले पाहीजे.आजचा दिवस हा सन्मानाचा असून हेच ऋणानुबंध जपता आले पाहीजे.त्यासाठी ध्येय तसेच विचार महत्त्वाचे असल्याचे विचार व्यक्त करत अॅड.मनकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
उपसरपंच मारूती काळे यांनी चांगल्या कल्पना,विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे.याच विचाराने गोरगरीब शेतकऱ्यांनी विद्यालयाचा पाया उभा केला. हे विसरून चालणार नाही.जिल्हा परिषदेची शाळा वाळलेल झाड असून त्याला पाणी घालण्याचे काम करू.मुल मराठी शाळेत घडतात त्यासाठी गुणवत्ता सुधारणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.
कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब कासार,अॅड.ऐश्वर्या डेरे,मारूती आभाळे यांनी मार्गदर्शन केले.तसेच अॅड.मनकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी वर्षभरामध्ये विविध क्षेत्रामध्ये विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले.
अॅड.वसंतराव मनकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी केले.सुत्रसंचलन रामदास कासार यांनी केले.तर विजय भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शेवटी मिष्टांन्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
