आमचा डीएनए मराठी भाषेशी निगडीत आहे :- सोमनाथ राठी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

माणसाने चिंतातूर न होता चिंतामुक्त जीवन जगावे. पुस्तकानेच माणसाच्या जीवनात परिवर्तन होते. मोबाईल सारखे अनेक पर्याय पुस्तकात उपलब्ध आहेत. आमचे डोळे आणि हात तिकडे वळत नाही ही शोकांतिका आहे. पुस्तक विरंगुळा म्हणून वाचू नका! विशिष्ट वळणावर आपणल्याला महत्वपूर्ण निर्णय घेता आला पाहिजे ही मार्गदर्शक तत्व पुस्तके देतात. आपण आपले विजन तयार करायला हवे! आमचा डीएनए हा मराठी भाषेशी निगडीत आहे. वाचन संस्कृती रूजवणे हाच खरा मराठी भाषेचा गौरव आहे असे मौलिक प्रतिपादन व्याख्याते सोमनाथ राठी यांनी केले. संगमनेर साहित्य परिषद आयोजित मराठी गौरव भाषा दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्ताने “पसायदान” वाचनालयाचे
त्यांच्या हस्ते उदघाटन प्रसंगी ते राज पॅलेस येथे ते बोलत होते. ते म्हणाले की, “का” ? असा प्रश्न पडलाच पाहिजे. पुस्तक वाचावेच असा नियम वाचनालयाने करावा.
सोशल मीडिया पासून दूर रहा, स्वनिर्मित करा,
जो पर्यंत तुम्ही खोलवर जात नाही तोवर मोती, जड, जवाहर रत्न कसे मिळणार ? तुमचा काळ पक्का तरच तुमचे यश पक्के हे लक्षात घ्या. संपत्ती आणि आनंदाचे रहस्य काय आहे हे पुस्तकेच सांगू शकतात कारण पुस्तकच ज्ञानाचा दिवा आहे. वाचले तरच विचार ,आचार, कृती बदलेल, पुस्तक भावतात ती वाचली पाहिजे. आपल्या जडणघडणीत पुस्तकाचा मोलाचा वाटा असून त्याचे सर्व श्रेय मी पुस्तकालाच देतो असेही ते म्हणाले. श्वासावर जीवन आहे, नात्याच्या सीमा ठरवा ,तसेच वागा. म्हणजे त्रास होणार नाही. मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. कार्यकारण भाव नसेल तर स्वत:चा वेळ वाया घालू नका!
मनाची भाषा हीच सर्वश्रेष्ठ भाषा असल्याचे सांगत. चॅलेंज हे स्वतःशी असाव असे ते म्हणाले. संवादा नंतर साहित्य प्रेमींनी सुरूचीचा स्वाद घेत आनंद लुटला . कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहित्य परिषदेचे सर्व सदस्यांनी परिश्रम
घेतले. साहित्यिक हिरालाल पगडाल, प्रकल्प व ग्रंथालय प्रमुख इद्रिस शेख, उपाध्यक्ष लक्ष्मण ढोले, सचिव ज्ञानेश्वर राक्षे, सहसचिव अनिल सोमणी, सैय्यद असिफ, प्रा. सुरेश परदेशी, शशांक गंधे, आदि मान्यगन व रसिक उपस्थित होते. बाळकष्ण महाजन यांच्या सुरेल पसायदानाने सांगता झाली. प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांंनी, परिचय ज्ञानेश्वर गोंटे तर सूत्र संचलन मुकंद डांगे व आभार गिरीश सोमाणी यांनी मानले.

श्री राठी यांनी एक हजार पुस्तके वाचली असून बाराशे पुस्तकांंचे ग्रंथालय आहे. वाचक प्रेमी साठी हे ग्रंथालय खुले असल्याचे त्यांनी सांगून. जीवनात बदल घडवायचा असेल तर लेखक रत्नसुंदर सुरेश्वर महाराज यांचे ‘मनाच्या आरशावर कोरून ठेवा’, “का” ने करा सुरुवात- सायमन् सिनेक, ‘आनंदाचे व संपत्तीचे रहस्य’ -लेखक नवल रविकांत, तसेच स्व. ओंकारनाथ मालपाणी यांचे ‘पत्रसंस्कार’, जी. के. प्रधान यांचे ‘साद देती हिमशिखरे’ ही पुस्तके आवर्जून वाचा असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!