राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले अप्रतीम कामे नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही….श्री.सुभाषराव हळनोर

महाराष्ट्रातील चारी धाम पैकी पवित्र तिर्थ क्षेत्र नाशिक येथे रामकुंडावर अप्रतीम असे ऐतिहासिक मंदीर,घाट बांधले आहेत.ही त्यांनी केलेले कार्य आपणास कायम प्रेरणा देणारी आहेत.परंतु त्यांनी केलेले ऐतिहासिक कामे हे नाशिक महानगरपालिका दुरुस्तीच्या नावाखाली नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न करित आहे त्यामुळे येथिल प्रशासन खरोखर गझनीच्या मोहम्मद याचे अनुकरण करतेय की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या विकृत घटनेचा विविध स्तरातून निषेध करत आहे.तसेच नाशिक प्रशासना विरुध्द जनतेमध्ये प्रचंड असंतोषाचे वातवरण निर्माण झाले आहे.नाशिक येथे रामकुंडावर अहिल्याघाट म्हणून प्रशासकीय मान्यंता नुकतीच मिळाली असुन तो उत्तम स्थितीत आहे.परंतु दुरुस्तीच्या नावाखाली घाटाचे उत्खनन स्थानिक प्रशासनाने सुरु केले.सदर कृत्य हे निषेधार्य आहे. जागतिक किर्तिच्या प्रथम महिला राज्यकर्त्या पु.अहिल्यादेवी होळकर यांच्या यांनी केलेल्या या महान कार्याचा अवमान आहे.त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रणित संघटना ,यशवंत सेना अहिल्यानगर यांचे वतीने मोठे जन अंदोलन छेडण्यात येणार असुन या गझनी प्रवृत्तीचा नाशिक येथिल प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.भारतात एवढी मोठी प्रचंड सामाजिक,धार्मिक कार्य केली. मग ते सर्व जाती धर्माचे मंदीर जिर्नोध्दार,पाणी पिण्यासाठी बारवं,घाट,रस्ते,वृक्ष लागवड ,धर्म शाळा,अन्नछत्रे उभारली आणि लोककल्यानकारी योजनांची प्रभावी अमंलबजावणी केली.एक उत्कृष्ट न्यायी प्रशासक म्हणून जागतिक किर्तिची महिला राज्यकर्ती म्हणून बहुमान मिळविला आहे.नाशिक प्रशासन या महान राज्यकर्ती महिलेने केलेल्या कार्याचा अवमान करत आहे.अशा संतप्त भावना राज्यातील समाजामध्ये निर्माण झाल्या असुन सध्या शांत असलेल्या समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा,अराजकता, निर्माण करण्याचा काही विघ्न संतोषी प्रशासनात असलेल्या अधिकारी यांचेकडून होत आहे.मुठभर काही ठारविक ठेकेदारांना खुश करण्यासाठी शासनाचे पैसे बोगस ठिकानी खर्च करण्याचा जो केविलवाणी प्रयत्न नाशिक प्रशासनाकडून केला जातो तो कधीही यशस्वी होणार नाही.याच अनुषंगाने आमचे सहकारी अहिल्यादेवी जयंती मोहत्सव समितीचे समाधान बागल यांनी याबाबत जो आवाज उठविला आहे.त्यांचे मागे संपुर्ण महाराष्ट्रात सर्व शक्तिनीशी समाज आणि धनगर समाजाच्या विविध संघटना,पदाधिकारी,कार्यकर्ते भक्कमपणे उभे आहेत.त्यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन देवून कळविले आहे.जर प्रशासनाने याची गंभीर दाखल घेतली नाही.तर मोठे जनअंदोलन यशवंत सेना अहिल्यानगरच्या वतीने करण्यात येणार आहे.त्यावेळी काही शांतता, सामाजिक परिस्थिती बिघडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहिल याची नोंद घ्यावी.असे आवाहन यशवंत सेना जिल्हा प्रमुख श्री.शिवाजी नवले,उपजिल्हाप्रमुख श्री.सुभाषराव हळनोर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!