सहवासाच्या आठवणी, डोळ्यांत अश्रू; वडगाव पान येथे निरोप समारंभ उत्साहात

संगमनेर  / लोकवेध live न्यूज

शिक्षकांच्या बदल्या हा नोकरीतील अविभाज्य टप्पा असला तरी निरोपाचा क्षण नेहमीच भावनिक ठरतो. असाच एक भावस्पर्शी सोहळा वडगाव पान केंद्रशाळेत अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या बदली धोरणानुसार झालेल्या ऑनलाईन प्रक्रियेत वडगाव पान केंद्रातील तब्बल २६ शिक्षकांची बदली झाली. त्यांना कार्यमुक्त करून निरोप देण्यासाठी वडगाव पान केंद्राच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या समारंभात बदली झालेल्या सर्व शिक्षकांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन केंद्रप्रमुख सौ. आशा घुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्र मुख्याध्यापिका संगिता वाकचौरे, मुख्याध्यापक रमेश निघुते, एकनाथ साबळे, दत्तात्रय जोंधळे, हिरा कोल्हे, विठ्ठल कडूसकर यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, शुभेच्छांचा वर्षाव आणि डोळ्यांतून वाहणारे आसवे यामुळे वातावरण क्षणाक्षणाला अधिकच भावनिक होत गेले.

निरोप समारंभाला बदली झालेले शिक्षक सौ. वंदना सातपुते, रोहिणी राऊत, अश्विनी मंजुरे, जया आहेर, संगिता वाकचौरे, बंडू कोल्हे, सोमनाथ गंभीरे, अशोक हांडे, संगिता पाटोळे, वैभव जोशी, योगिता गोफणे, शिवाजी बनसोडे, सुजाता शेटे, संगिता जाधव, सुनिल झावरे, वैशाली पावडे, बाबासाहेब जाधव, मनिषा गाढवे, संदीप वाकचौरे, विजय सातपुते, सुभाष घनदाट, स्वाती शेवाळे, शकील पटेल, सुरेखा सहाणे, आफरीन शेख आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

बदली झालेले शिक्षक सुनिल झावरे, सोमनाथ गंभीरे आणि संगिता जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबरचा सहवास, शाळेतील गोड आठवणी आणि पुढील वाटचालीबाबतची भावना व्यक्त करताना सभागृहाला क्षणभर स्तब्ध केले. त्यांचे शब्द ऐकताना अनेक शिक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

केंद्रप्रमुख सौ. आशा घुले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बदली हा सेवेतला अविभाज्य भाग आहे. परंतु आपण जिथेही जाऊ तिथे शैक्षणिक कार्यात उत्कृष्ठता साधावी आणि केंद्रातील सलोखा व एकोपा कायम ठेवण्याचा आदर्श द्यावा.” त्यांनी बदली झालेल्या सर्व शिक्षकांना नवीन शाळेतील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास भागवत, राजेंद्र सूर्यवंशी, शिवाजी नरवडे, सुरेश साळुंके व सखाराम पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

🌹 गुलाबपुष्पांच्या सुवासात, टाळ्यांच्या गजरात आणि आठवणींच्या अश्रूंनी भारलेल्या या निरोप समारंभाने वडगाव पान केंद्रातील एक सोनेरी अध्याय कायमचा स्मरणात राहील. 🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!