*स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनीअथक परिश्रम घ्यावे*…..*पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे
,निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
रयत शैक्षणिक संकुल, सात्रळ ता.राहुरी येथे. कॉ.पी बी कडू पाटील फाउंडेशन व रयत शैक्षणिक संकुल, सात्रळ यांचे वतीने वाचन प्रेरणा दिन व पुस्तक प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते राहुरीचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे साहेब यांच्या उपस्थितीत भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ,थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व थोर स्वातंत्र्यसेनानी कॉ.पी.बी.कडू पा यांना यावेळीअभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील, अक्षर मानव वाचनालयचे संस्थापक व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य पंकज कडू पा.मा.उपसरपंच गणेश कडू पा.पत्रकार किशोर भांड,प्राचार्य सिताराम गारुडकर ,मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे ,पर्यवेक्षिका हेमलता साबळे प्रा.विलास दिघे शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते. अक्षर मानव वाचनालयातर्फे उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना पोलीस उपनिरीक्षक संजयजी ठेंगे यांनी भारतीय कायदेविषयक माहिती देऊन सोशल मीडियाचा वापर कसा करावा, सायबरचे नियम काय आहेत हे समजावून घेण्याचे व योग्य अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांना सुरक्षा व वाचन याविषयी सखोल माहिती देऊन त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला, वाचाल तर वाचाल याचे महत्त्व विशद करून त्यांनी पुस्तके व माणसे वाचायला शिकली पाहिजे असे सांगितले. आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी सतत जागरूक असले पाहिजे त्याची सुरुवात स्वतःपासून करून समाजासाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठीअथक परिश्रम केले पाहिजे तरच आपण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकाऊ धरू शकतो,नवीन आव्हानांना सामोरे जाऊ शकतो व आपले जीवन समृद्ध बनवू शकतो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमा पठाण, अश्र्विनी सोहनी,रामदास तांबे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे यांनी मानले.
